Friday, February 5, 2010

नातं तुझं नि माझं

Friends, one more Marathi poem. I wrote this poem on last Valentine's day... for whom ? you all know it very well :)

There were several thoughts running in my mind while writing this poem. Relation between every husband and wife is full of so many aspects... Basically this comes from our Life which is full of different colors, different situations, different kinds of people..

Wish that every relation grows forever... and only Happyness remain in all hearts...



नातं तुझं नि माझं
गुलाबाच्या फुलासारखं
टवटवीत आणि सुगंध देणारं...



नातं तुझं नि माझं
नदीच्या खळाळत्या प्रवाहासारखं

निर्मळ, शांत आणि कायम पुढे जाणारं...




नातं तुझं नि माझं
सागराच्या लाटांसारखं
आल्हाददायक मनाला उल्हासित करणारं...


नातं तुझं नि माझं
एखाद्या खोडकर लहानग्यासारखं
खट्याळ पण निष्पाप...


नातं तुझं नि माझं

कोकिळेच्या आवाजासारखं
सुरेल आणि लयबद्ध....


नातं तुझं नि माझं

सुर्योदयासारखं
रोज जगण्याची नवी प्रेरणा देणारं...



नातं तुझं नि माझं
पुनवेच्या चंद्रासारखं
अंधाराचा नायनाट करणारं...



नातं तुझं नि माझं

एक त्रिकालावादी सत्य
चिरंतन कालापर्यंत टिकणारं...